डोळ्यांत मिरचीपूड फेकत महिलेकडील २४ तोळ्यांचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST2021-08-01T04:14:25+5:302021-08-01T04:14:25+5:30

निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथील एका २७ वर्षीय घटस्फोटित सुनेचा पाठलाग करत गुरुवारी सायंकाळी संशयित पती, सासू, नणंद यांनी मिरचीची ...

Throwing pepper powder in the eyes, they looted 24 weights of jewelery from the woman | डोळ्यांत मिरचीपूड फेकत महिलेकडील २४ तोळ्यांचे दागिने लुटले

डोळ्यांत मिरचीपूड फेकत महिलेकडील २४ तोळ्यांचे दागिने लुटले

निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथील एका २७ वर्षीय घटस्फोटित सुनेचा पाठलाग करत गुरुवारी सायंकाळी संशयित पती, सासू, नणंद यांनी मिरचीची पूड पीडित फिर्यादी मयूरी नारायण बांगर यांच्या डोळ्यांत फेकली. यावेळी संशयित आरोपी विनोद लाड (पती), पद्मा लाड (सासू), सोनाली लाड (नणंद) आणि एक त्यांची साथीदार महिला (रा. महादेववाडी, सातपूर) यांनी बळजबरीने त्यांना मारहाण करत त्यांच्या ताब्यातील दागिने, रोकड हिसकावून नेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गुरुवारी सायंकाळी बांगर त्यांचा नंदाई, योगेश जाधव असे दोघेजण चारचाकी वाहनाचे टायर पंक्चर झाल्याने औरंगाबाद रोडवर असलेल्या एका नर्सरीजवळ थांबले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी विनोद, पद्मा, सोनाली व एका महिलेविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आडगाव पोलिसांनी संशयित विनोद लाड यास अटक केली आहे.

Web Title: Throwing pepper powder in the eyes, they looted 24 weights of jewelery from the woman