जेसीबीवर दगड फेक
By Admin | Updated: November 19, 2014 01:24 IST2014-11-19T01:23:42+5:302014-11-19T01:24:12+5:30
जेसीबीवर दगड फेक

जेसीबीवर दगड फेक
तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर आरक्षित असलेल्या भूखंडावरची अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक महादेवनगरात गेले असता तेथे एका युवकाने जेसीबीवर दगड फेकला, तर संतप्त महिलेने अंगावर केरोसिन ओतून घेतले होते. तथापि, पोलिसांनी त्यांना आवरले. दगडफेक केल्याप्रकरणी नवीन जोशी या युवकाला ताब्यात घेतले आहे. सकाळी अतिक्रमणविरोधी पथकाने साधुग्रामच्या जागेवरची अतिक्रमणे भुईसपाट केल्यानंतर पथक शूर्पणखा मंदिराजवळील महादेवनगरात असलेल्या जागेचे प्रकरण न्यायालयात सुरू असून, मनपाने कोणतीही सूचना न देता अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याने संतप्त झालेल्या त्या युवकाने जेसीबीवर दगड फेकला, तर जवळच एका घरात राहणाऱ्या पार्वताबाई दोरकर या महिलेने पथकाला विरोध दर्शविण्यासाठी अंगावर केरोसिन ओतून घेतले होते; मात्र त्यानंतरही पथकाने अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरूच ठेवली होती.