वर्षभरात नायलॉन मांजाने कापले १५० पक्ष्यांचे पंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:35 IST2020-01-13T23:58:28+5:302020-01-14T01:35:58+5:30
निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

वर्षभरात नायलॉन मांजाने कापले १५० पक्ष्यांचे पंख
नाशिक : निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील पाच वर्षांपासून मोठी ‘संक्रांत’ ओढवत आहे. जानेवारीपासून संकटात सापडणारे पक्षी डिसेंबरपर्यंत शहरातील विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. २०१९ साली डिसेंबरअखेरपर्यंत १५० पक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्यात मनपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले, मात्र यापैकी बहुतांश पक्षी जायबंदी झाले तर काहींचा मृत्यूही झाला. तसेच काही पक्ष्यांनी हवेत पुन्हा भरारीदेखील घेतली. वर्षभरात सुमारे ७० ते ८० पक्षी नायलॉन मांजामुळे जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजीचा आनंद लुटला जातो. हा आनंद लुटताना नायलॉन मांजाचा वापर टाळला तर दुर्घटनादेखील कमी होण्यास मदत होईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासन, वनविभाग, पोलीस प्रशासनाकडून सातत्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नायलॉन मांजाचा वापर, विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील काही पक्षीप्रेमींशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दरवर्षी मकरसंक्रांतीनंतर जखमी पक्ष्यांचे रेस्क्यू कॉलची संख्या खूप वाढते. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही डिसेंबरपासूनच असे कॉल शहरातील पक्षीप्रेमींना येण्यास सुरुवात झाली होती. २०१८ साली सुमारे ७२ पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता तर २०१९ साली जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ८० पक्षी मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.
२०१९ साली जायबंदी पक्षी
४ कावळा - ४४
४ कबुतर -
४ घार - १७
४ घुबड- ११
४ बगळा- १७
४ वटवाघुळ- ८
४ करकोचा- ३
४ साळुंखी- २
४ कोकीळ- ३
४ पोपट - २
२०१९ मध्ये दरमहा जखमी पक्ष्यांची संख्या
जानेवारी- २६
४ फेब्रुवारी- १३
४ मार्च- १३
४ एप्रिल- ९
४ मे-१६
४ जून- १९
४ जुलै- ७
४ आॅगस्ट-५
४ सप्टेंबर- ८
४ आॅक्टोबर- ९
४ नोव्हेंबर - ११
४ डिसेंबर- १६