एटीएम कार्डाद्वारे सव्वादोन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 18:48 IST2017-08-11T18:47:41+5:302017-08-11T18:48:36+5:30

through,atm,card,cheating,case,happen | एटीएम कार्डाद्वारे सव्वादोन लाखांची फसवणूक

एटीएम कार्डाद्वारे सव्वादोन लाखांची फसवणूक


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी एटीएममध्ये गेलेल्या इसमाचे एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत त्याद्वारे सव्वादोन लाखांची रक्कम काढून घेतल्याचे समोर आले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाट्यावरील अश्विननगरमधील रहिवासी शिवाजी कचरू आव्हाळे हे १० जुलै रोजी सिडकोतील संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एटीएम केंद्रावर पत्नीच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी गेले होते़ त्यावेळी संशयित राजीव हसमुखभाई भट (२९, रा. हेमगेट टॉवर, कासीमिरा गाव, मुंबई) याने हातचलाखीने त्यांच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदली केली़ यानंतर या कार्डचा वापर करून तब्बल २ लाख २० हजार रुपये काढून घेतले़
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: through,atm,card,cheating,case,happen