आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लबतर्फे विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:19 IST2018-01-12T23:49:20+5:302018-01-13T00:19:01+5:30
कळवण : सहलीचे आयोजन व विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत इनरव्हील क्लबने आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिन उत्साहात साजरा केला.

आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लबतर्फे विविध स्पर्धा
कळवण : आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिनाचे औचित्य साधून शालेय सहलीचे आयोजन व विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन कळवण येथील इनरव्हील क्लबने आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिन उत्साहात साजरा केला.
कळवण येथील इनरव्हील क्लबच्या वतीने मुलांसाठी गणेशनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात सहलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या गणेशनगर व रामनगर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करण्यात आल्याचे इनरव्हील क्लब कळवणच्या अध्यक्ष मीनाक्षी मालपुरे यांनी सांगितले. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी वत्सला गुंजाळ, उषा पवार, डी. के. भोये उपस्थित होते. यावेळी मीनाक्षी मालपुरे व प्राथमिक शिक्षक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. योगिता अमृतकार, पूजा चव्हाण यांना सभासदत्व देण्यात आले. क्लबच्या सरचिटणीस प्रमिला जैन यांनी आभार मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मीनाक्षी मालपुरे, प्रमिला जैन, अनिता जैन, मनीषा वाघ, लता वेढणे, शोभा पगार, अिश्वनी पाटील, वैशाली कोठावदे, निर्मला संचेती, सुचिता रौंदळ, उषा कोठावदे, निशा वालखेडे, मनीषा शिंदे, रत्ना मालपुरे, रेखा कोठावदे, रोहिणी पगार, भारती कोठावदे, योगिता अमृतकार, मनीषा पगार आदींनी परिश्रम घेतले.
मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येऊन या स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर इनरव्हील क्लबच्या सदस्यादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी गाणे आणि नृत्य सादर केली.