शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:24 IST2017-10-23T00:24:49+5:302017-10-23T00:24:55+5:30
केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे.

शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात
नाशिक : केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ४६वे पुष्प गुंफताना ‘बळीराजा, परंपरा आणि वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष किसन गुज्जर व नानूबाई सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी बोलताना ढमाले म्हणाले, केंद्रात व राज्यात मनुवादी विचारसरणीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील व देशातील शेतकरी संकटात आला आहे. शेतक ºयांची मूळ सिंधू संस्कृती ही कृषी आधारित आणि महिला प्रधान होती. परंतु पुरुष प्रधान आर्यांनी सिंधू संस्कृ तीवर अतिक्रमण करून येथील कृषी संस्कृतीच मोडीत काढण्याचे प्रयत्न केला. प्रास्ताविक राजू गावले यांनी केले. सूत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले. अभिजित गोसावी यांनी आभार मानले.
शेतकरीविरोधी धोरण
देशात आर्यांचे पाईक आणि मनुवादी विचारसणीचे सरकार देशात सत्तेत आल्याने शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असून, शेतकºयांच्या सुपीक जमिनींवर मुंबई- दिल्ली कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन यांसारखे प्रकल्प उभारून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकºयांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाटला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.