त्र्यंबकला भाविकांची गर्दी
By Admin | Updated: November 15, 2016 00:40 IST2016-11-15T00:27:45+5:302016-11-15T00:40:18+5:30
त्र्यंबकला भाविकांची गर्दी

त्र्यंबकला भाविकांची गर्दी
त्र्यंबकेश्वर : गेल्या २/३ दिवसांपासून सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर येथे भाविकांची गर्दी उसळली असून, त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी भाविक आतुर होऊन तासन्तास रांगेत उभे राहतात. त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठीचा पूर्व दरवाजा सध्या त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी बंद असल्याने सध्या दर्शनार्थींना उत्तर महादरवाजाने दर्शनासाठी सोडले जाते. त्यामुळे भाविकांच्या रांगा लागत आहेत.सध्या यात्रेकरूंमुळे त्र्यंबकेश्वरचे हॉटेल्सवाले, भेटवस्तू, प्रसादी दुकानदार, गवत विकणाऱ्या महिला, भीक मागणारे आदिंना व्यवसायाचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. दरम्यान, संपूर्ण त्र्यंबकनगरी भाविकांमुळे गजबजली आहे. दुसरीकडे नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प शांती आदि धार्मिक विधी करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठीही भाविकांनी गर्दी केली आहे. हॉटेल, लॉजेस, धर्मशाळा आदि हाउसफूल झाल्या आहेत. एसटी बस, खासगी टॅक्सी वाहतूकदारांचे धंदे तेजीतच आहेत. (वार्ताहर)