‘ब्रुम-ब्रुम’चा थरार : फाळके स्मारकात आज रोमांचक अनुभव

By Admin | Updated: June 13, 2014 00:18 IST2014-06-12T22:46:14+5:302014-06-13T00:18:58+5:30

‘रॅली आॅफ महाराष्ट्र’चा शुभारंभ

Thriller of 'Brum-Broom': Exciting experience today at the Phalke Memorial | ‘ब्रुम-ब्रुम’चा थरार : फाळके स्मारकात आज रोमांचक अनुभव

‘ब्रुम-ब्रुम’चा थरार : फाळके स्मारकात आज रोमांचक अनुभव

नाशिक : इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या महिंद्र अ‍ॅडव्हेंचर महाराष्ट्र रॅलीला आज सायंकाळी सिटी सेंटर मॉलपासून शानदार शुभारंभ झाला. नाशिककरांना
सदर स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा
थरार अनुभवण्याची संधी उद्या शुक्रवारी फाळके स्मारक येथे मिळणार असून, शनिवारपासून प्रत्यक्ष स्पर्धेचा थरार घोटी-सिन्नर रस्त्यावरील अवघड वळणांच्या रस्त्यावर सुरू होईल.
वेस्टर्न इंडियन स्पोटर््स असोसिएशन (विसा) च्या वतीने इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचे आयोजन नाशकात करण्यात आले असून, महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रला आज शानदार शुभारंभ झाला. सिटी सेंटर मॉल येथे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इंडियन रॅली चॅम्पियनशिपचा गतविजेता गौरव गिल याच्या गाडीला सरंगल यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर ठरावीक वेळेच्या अंतराने स्पर्धेतील वाहने मार्गस्थ झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्र अ‍ॅडव्हेंचरचे बिजॉय कुमार, नबेंन्दू अचारजी, रोहन अल्बेल, अविजित भट्टाचार्य, अभय आपटे, मोनीत ढवळे उपस्थित होते. रॅलीतून गाड्या सिटी सेंटर मॉल येथून सुटून एबीबी सर्कल, कॉलेजरोड, गंगापूरनाका, जुना आग्रारोड, त्र्यंबक नाका आणि परत सिटी सेंटर मॉल येथे परत आल्या. यावेळी विसाचे अश्विन पंडित, स्वाती पंडित, महिंद्र अ‍ॅडव्हेंचरचे सहकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Thriller of 'Brum-Broom': Exciting experience today at the Phalke Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.