शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार; अकरा वर्षांनंतर लागला मुहूर्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 10:02 IST

पुणे, सातारा, सांगली, जळगाव येथील स्पर्धकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : सकाळपासून जमलेली गर्दी, लाडक्या सर्जा राजा सरसावलेले आणि गाडी मालकही ईरेला पेटलेले... स्पर्धा सुरू झाली आणि मालकाच्या आदेशासरशी बैलांनी प्राणपणाने पळण्यास सुरुवात झाली.... तब्बल अकरा वर्षानंतर बैलगाडी स्पर्धेचा हा थरार नाशिककरांना बोरगड परिसरात अनुभवायला मिळाला. 

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाड्यांच्या शर्यतील मान्यता दिल्याने मंगळवारी (दि. ६) या स्पर्धा बोरगडजवळील ठक्कर मैदानावर पर पडल्या. या ठिकाणी ग्रामस्थांच्या पुढाकारातून नेहमीच स्पर्धा होत असल्या तरी त्यावर बंदी आल्याने अकरा वर्षांपासून स्पर्धा बंद होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिल्याने म्हसरूळचे ग्रामस्थ आणि आमदार राहुल ढिकले यांच्या पुढाकाराने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेसाठी खास चार ट्रॅक तयार करण्यात आले हेाते. तसेच  शर्यतींसाठी धावणाऱ्या जातीच्या बैलजोड्या आणण्यात आल्या होत्या. यात खिल्लारी, म्हैसूर, गावरान, निळा कोसा, कर्नाटकी, गावरान खिल्लार अशा अनेक जातींचे बैल स्पर्धेत उतरविण्यात आले हेाते. स्पर्धेसाठी खास पुणे, सातारा, सांगली, पुणे येथून खास स्पर्धक दाखल झाले होते. यावेळी विजेत्यांना बुलेट आणि अन्य पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. 

यावेळी आयोजक आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, माजी महापौर रंजना भानसी, म्हसरूळ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक साखरे, माजी गटनेता अरुण पवार, हेमंत शेट्टी, मुकेश शहाणे, दीपक निकम, सोमनाथ वडजे, राजेंद्र सातकर, रमेश बोरस्ते, वसंत मोराडे, राजेंद्र थोरात तसेच म्हसरूळ येथील ग्रामस्थ मेाठ्या संख्येने सहभागी झाली हाेते.

चुरशीची लढत  झाली ‘टाय’

- बैलगाडी शर्यतीतील लढत टाय ठरली. बुलेट आणि ४१ हजार रुपये रोख असे बक्षीस देवीदास सानप, तिगाव, संगमनेर आणि बबलू शेठ फुलोरे कल्याण यांना विभागून देण्यात आले. तर स्प्लेंडर बाइक रामा शामा ग्रुप मखमलाबाद यांना देण्यात आली. 

- दुसरी स्प्लेंडर बाइक दीपक गवळी, नारायण टेम्बी यांना तर तिसरी स्प्लेंडर बाइक मेजर ग्रुप दिंडोरी यांना देण्यात आली. पाचवे २१ हजार रुपयांचे पारितोषिक निफाड तालुक्यातील नैताळे गावास देण्यात आले.

 

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यत