दिंडोरी : दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील पांडव पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन युवक ठार झाले आहेत. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले.गुरु वारी (दि.२९)सकाळी १० वाजेच्या सुमारास पल्सर गाडी (क्र मांक एम.एच. १५ सीडी ६५५४) आणि अॅव्हेन्जर गाडी (क्र मांक एम.एच. १५ इएल ६८८९) या दोन मोटारसायकलची दिंडोरी - नाशिक रस्त्यावरील पांडव पेट्रोल पंपा जवळ ओव्हरटेक च्या प्रयत्नात समोरा समोर धडक झाली. त्यात संकेत माणिक बोडके (वय १८ ), महेश संतोष गांगोडे (वय १८) रा. ढकांबे आणि संदीप खंडू गांगुर्डे (वय २३) रा. माळेदुमाला हल्ली मुक्काम वणी हे ठार झाले आहेत.संकेत बोडके व महेश गांगोडे हे ढकांबे येथून दिंडोरीत महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी येत होते. संदीप गांगोडे हा वणीहून कामा निमित्ताने एकटाच दुचाकीवरु न जात होता. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करीत असतांना दोघा दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले परंतु, त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
दिंडोरीजवळ दोन दुचाकींच्या अपघातात तिन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:09 IST
ओव्हरटेक च्या प्रयत्नात समोरा समोर धडक
दिंडोरीजवळ दोन दुचाकींच्या अपघातात तिन युवक ठार
ठळक मुद्देसंकेत बोडके व महेश गांगोडे हे ढकांबे येथून दिंडोरीत महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी येत होते.