शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

तीन वर्षांत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या वाढली; सर्वेक्षणातील निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:39 IST

संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व उपचाराअंती पूर्ण बरा होऊ शकणाºया कुष्ठरोग्यांची जिल्ह्यात दरवर्षी संख्या वाढत चालली असून, कृष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या आरोग्य विभागाच्या मूळ उद्देशाला तडा बसत आहे.

नाशिक : संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व उपचाराअंती पूर्ण बरा होऊ शकणाºया कुष्ठरोग्यांची जिल्ह्यात दरवर्षी संख्या वाढत चालली असून, कृष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या आरोग्य विभागाच्या मूळ उद्देशाला तडा बसत आहे. गेल्या तीन वर्षांत आरोग्य विभागाने केलेल्या घरोघरी जाऊन तपासणीत दरवर्षी कुष्ठरोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, त्यात मालेगाव येथील रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत, सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात पुन्हा कुष्ठरोग रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.हवा अथवा संसर्गातून शरीरात प्रवेश करणारा कुष्ठरोगाचा जीवाणू वीस वर्षांत कधीही आपले डोके वर काढू शकतो त्यामुळे कुष्ठरोगाची लक्षणे तत्काळ दिसत नसली तरी, टप्प्याटप्प्याने तो शरीरात वाढत असतो. त्यात प्रामुख्याने शरीरावर फिक्कट किंवा लाल रंगाचे चट्टे दिसणे, मज्जातंतू जाड होणे, हातापायाची बधीरता येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे अशी लक्षणे हमखास कुष्ठरोगाची असून, त्यातही टप्पा एक ते पाचपर्यंतच्या रुग्णांवर औषधोपचार करून कुष्ठरोगाला अटकाव व पूर्णत: बरा करता येतो. त्यासाठी राष्टÑीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यात गेल्या तीन वर्षांत ४० लाख नागरिकांची तपासणी केली असता, त्यातून दरवर्षी प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरी भागात कुष्ठरोगाला फारसा थारा नसला तरी, ग्रामीण भागात मात्र कुष्ठरोगाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. सन २०१६-१७ मध्ये ३१५, तर सन २०१७-१८ मध्ये २६४ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी मात्र हेच प्रमाण पुन्हा वाढून ३५८ इतके झाले आहे. त्यात मालेगाव व पाठोपाठ नांदगाव या तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे.कुष्ठरोग शोध अभियानआरोग्य विभागाने त्याची दखल घेतली असून, अचानक कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढण्याच्या कारणांची मीमांसा केली जात आहे. त्यासाठी येत्या १३ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान घरोघरी जाऊन राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल