नाशिक : सगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गावातील संशयित काशीनाथ सारुक्ते याने बालिकेला वही दाखविण्याच्या बहाण्याने अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंग केल्याची घटना गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्यावर गुरुवारी सुनावणी होऊन न्यायालयाने संशयित आरोपी काशीनाथ यास तीन वर्षांचा कारावास व पाच हजारांचा दंड ठोठावला.
इगतुपरी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी संशयिताला तीन वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:22 IST
इगतपुरी पोलीस ठाण्यात काशीनाथविरुद्ध बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इगतुपरी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी संशयिताला तीन वर्षांचा कारावास
ठळक मुद्देवही दाखविण्याच्या बहाण्याने अश्लील छायाचित्रे दाखवून विनयभंगकाशीनाथविरुद्ध बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल