शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 21:46 IST

सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य मिळून न आल्याने कुटुंबिय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बांसरी नजरेस पडली...

ठळक मुद्देवाघ कुटुंबियांवर आभाळ फाटले

नाशिक : विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबाचा एकुलता एक तीन वर्षाचा चिमुकला आराध्यचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण विहितगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाब उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एलआयसी मुंबईच्या शाखेत अधिकारीपदावर नोकरीस असलेले सचिन वाघ हे आपल्या कुटुंबियांसमवेत विहितगाव येथील त्यांच्या कृपासिंधू बंगल्यात वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा चिमुकला मुलगा आराध्य हा बंगल्याच्या परिसरात खेळत होता. बराच वेळ होऊनदेखील आराध्य घरात आला नाही, तसेच बंगल्याबाहेरही नजरेस पडला नाही, म्हणून त्याच्या आईसह कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य मिळून न आल्याने कुटुंबिय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बांसरी नजरेस पडली असता कुटुंबियांनी हौदाजवळ जाऊन उघड्या झाकणातून आत डोकावून बघितल असता त्यामध्ये आराध्य असल्याचे त्यांना आढळले. तत्काळ आराध्यला आजुबाजुच्या नागरिकांच्या मदतीने हौदाबाहेर काढून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखविले; मात्र डॉक्टरांनी त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने वाघ कुटुंबियांवर आभाळ फाटले असून आराध्यच्या आईवडिलांसह सर्वच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी पंचनामा क रून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातPoliceपोलिस