शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

तीन वर्षीय मुलाचा हौदात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:55 IST

विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबातील एकुलत्या एक तीन वर्षांच्या चिमुकल्या आराध्यचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नाशिकरोड : विहितगाव येथील महाराजा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या कृपासिंधू बंगल्याच्या आवारात खेळताना अचानकपणे येथील पाण्याच्या हौदात पडून वाघ कुटुंबातील एकुलत्या एक तीन वर्षांच्या चिमुकल्या आराध्यचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या हृदयद्रावक घटनेने विहितगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एलआयसी मुंबईच्या शाखेत अधिकारीपदावर नोकरीस असलेले सचिन वाघ हे आपल्या कुटुंबीयांसमवेत विहितगाव येथील त्यांच्या कृपासिंधू बंगल्यात वास्तव्यास आहेत. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मुलगा आराध्य हा बंगल्याच्या परिसरात खेळत होता. बराच वेळ होऊनदेखील आराध्य घरात आला नाही, म्हणून त्याच्या आईसह कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य आढळून न आल्याने कुटुंबीय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बासरी नजरेस पडली असता कुटुंबीयांनी हौदाजवळ जाऊन उघड्या झाकणातून आत डोकावून बघितले असता त्यामध्ये आराध्य असल्याचे त्यांना आढळले. तत्काळ त्याला हौदाबाहेर काढून बिटको रुग्णालयात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केल्याने वाघ कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. या घटनेने वाघ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.हौदाचे झाकण नादुरुस्तबंगल्याच्या आवारात असलेल्या भूमिगत पाण्याच्या हौदावरील लोखंडी झाकण नादुरुस्त झाले होते. हे झाकण दुरुस्तीसाठी काढण्यात आल्याने हौद उघडा होता. खेळतांना आराध्य दुर्दैवाने हौदात पडल्याने मरण पावल्याचे समजते.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिकDeathमृत्यू