शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेले तीन अट्टल गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:40 IST

नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात काही अट्टल गुन्हेगार दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईप्रसंगी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पाचपैकी तीन संशयिताना अटक केली आहे. अटक केलेले सर्वजण हे नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात काही अट्टल गुन्हेगार दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईप्रसंगी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पाचपैकी तीन संशयिताना अटक केली आहे. अटक केलेले सर्वजण हे नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत.  नांदगाव पोलीस ठाणे हद्दीतील जळगाव खुर्द शिवारात काही सराईत दरोडेखोर वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती नांदगाव पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी नांदगावचे पोलीस निरीक्षक बशीर शेख व त्यांच्या सहकाºयांनी जळगाव खुर्द शिवारात सापळा रचला. पोलीस मागावर असल्याचे कळताच सदर दरोडेखोर शिऊर बंगला रोडने पळू लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून दोन संशयितांना अटक केली. तसेच दरोडा टाकण्याचे साहित्य व नंबर प्लेट नसलेली पल्सर मोटारसायकलही जप्त केली.  येथून पळून गेलेल्या अन्य दरोडेखोरांच्या मागावर पोलीस असताना माणिकपुंज धरणाच्या दिशेने एक संशयित दुचाकीने जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता त्याने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. पुन्हा एकदा त्याने गोळीबार केल्यावर  पोलीस निरीक्षक शेख यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी  सदर दरोडेखोरास हीरोहोंडा स्प्लेंडर  (क्र. एमएच १७ बीके १४७९) या दुचाकीसह ताब्यात घेतले.  अन्य दोन दरोडेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.  नांदगाव पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दीपक अंबादास पोकळे (२५), रा. लोहारे, ता. राहाता, रामनाथ गोरख मोरे (२५), रा. पिंपळवाडी, ता. राहाता आणि अनिल ज्ञानेश्वर शिंदे (१९), रा. पुणतांबे, ता. राहाता, जि. नगर यांचा समावेश आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून, अहमदनगर पोलीस बºयाच दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहे. नगर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे.  दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपी व त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९९, ३०७, ३५३, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून दरोड्याचे साहित्य, मिरची पूड, चाकू, कटावणीसह स्क्रू ड्रायव्हर, एक पल्सर व एक स्प्लेंडर अशा दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.  याबाबतची माहिती समजताच पोलीस अधीक्षक संजय दराडे, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, मालेगाव शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिºहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मार्गदर्शन केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा