शहरातून तीन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST2020-12-03T04:24:31+5:302020-12-03T04:24:31+5:30

पहिली घटना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी संजय हिरामण थोरात (रा. शालिमार) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद ...

Three two-wheeler lampas through the city | शहरातून तीन दुचाकी लंपास

शहरातून तीन दुचाकी लंपास

पहिली घटना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी संजय हिरामण थोरात (रा. शालिमार) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता थोरात यांनी त्यांची दुचाकी (एमएच १५ इएन २४१२) जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळा विभागाच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती, यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. दुसर्‍या घटनेत विनयनगर येथील ताहिर अल्ताफ पठाण (रा. वडाळारोड) याने मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ताहिर पठाण याने त्याची दुचाकी (एमएच १५, जेबी ९३८०) प्रभू अपार्टमेंट, विनयनगर येथे पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. त्यामुळे डिक्कीत ठेवलेले ओळखपत्र, गाडीचे कागदपत्रदेखील चोरीला गेली. तिसरी घटना, इदगाह मैदान परिसरात घडली. नीलेश धनगर (रा. जुने नाशिक) यांनी २८ नोव्हेंबर रोजी त्यांची दुचाकी (एमएच १५ झेड ७९८१) राजदूत हॉटेलच्या पाठीमागे, इदगाह मैदानात उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.

Web Title: Three two-wheeler lampas through the city