दोडी येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी
By Admin | Updated: September 15, 2015 22:45 IST2015-09-15T22:44:25+5:302015-09-15T22:45:02+5:30
दोडी येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

दोडी येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी
सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दोडी येथील सर्व्हिस रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले. मंगळवारी दुपारी अडीच वाजता सदर घटना घडली.
संगमनेर येथील राजहंस दूध डेअरीचा ट्रक (क्र. एमएच १७ एजी ३१९४) सिन्नरहून संगमनेरकडे जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (क्र. एमएच १२ एफसी ६११२) समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहने अवजड असल्याने अपघाताचा प्रचंड आवाज झाल्याने घटनास्थळी नागरिकांची तत्काळ गर्दी झाली. या अपघातात राजहंस दूधचा ट्रकचालक बंडू भागवत कोकणे (४३), रा. पिंपळगाव कोंजिरा, ता. संगमनेर व मालवाहू ट्रकचालक मुळे (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह क्लिनर नवनाथ यादव खेमनर, रा. आंबोरे, ता. संगमनेर हे जखमी झाले. तीनही जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार आर.एम. सानप करीत आहे. (वार्ताहर)