शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

तीन तालुक्यांत पीक कापणी प्रयोग का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:24 AM

संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांचा सवालसहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : राज्य सरकारची महसूल यंत्रणा विश्वासार्ह असूनही सरकारकडून महसूल यंत्रणेवर का विश्वास ठेवला जात नाही, त्याचबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भयावह स्थिती असतानाही फक्त तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्त नागरिकांमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे, असा सवाल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केला आहे.पत्रात पुढे म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून ऐन पावसाळ्यात २३८ गावे व वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जनावरांचा चारा आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. राज्यात तीव्र पाणीटंचाई असूनही दुष्काळ जाहीर करण्यासाठी विलंब केला जात आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी, पेरणी (लागवड) क्षेत्र, मृद आर्द्रता व पिकांची स्थिती हे प्रमुख निर्देशांक आहेत. त्यानुसार, ‘केंद्राच्या नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग’ या संस्थेकडून पीक पाण्याच्या स्थितीबाबत राज्य शासनाला अहवाल आल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याने हा प्रकार म्हणजे एकप्रकारे राज्यातील महसूल यंत्रणेवर अविश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.एकीकडे एवढा गंभीर दुष्काळ असताना दुसरीकडे अनेक बँका व पतसंस्थांकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. दुष्काळामध्ये बँकेची कर्जवसुलीची नोटीस पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीने आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. विजेची थकबाकी असलेल्या शेतकºयांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. अघोषित वीज भारनियमनामुळे राज्यातील नागरिक हैराण झालेले आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकºयांना कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये यासाठी राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू करण्याची आवश्यकता असल्याची त्यांनी मागणी केली आहे.दुष्काळी स्थिती भयावहचांदवड व येवला तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, पीक पाहणी अहवालानुसार अत्यंत गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती आहे आणि महसूल यंत्रणेने जिल्हा प्रशासनास तसा अहवालही पाठविलेला आहे. दुष्काळी स्थिती एवढी भयावह असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ नांदगाव, मालेगाव व सिन्नर या तीन तालुक्यांमध्येच पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश दिल्याने त्यावरही भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस