शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन निलंबित, १६० गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:53 IST

शहरातील आरोेग्य व्यवस्थेच्या अचानक आॅन द स्पॉट जाऊन करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अनागोंदी आढळल्याने त्यावर जम्बो कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नाशिक : शहरातील आरोेग्य व्यवस्थेच्या अचानक आॅन द स्पॉट जाऊन करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात अनागोंदी आढळल्याने त्यावर जम्बो कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार बोगस कर्मचारी काम करताना आढळल्याप्रकरणी संबंधित कर्मचाºयाबरोबरच दोन स्वच्छता निरीक्षकांना निलंबनाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सहा विभागीय निरीक्षकांनाही कारणे दाखवा नोटिसा बजवण्यात आल्या आहेत तर विनापरवनगी गैरहजर राहणाºया १६० कर्मचाºयांना नोटिसा बजावतानाच त्यांचे एक दिवसाचे वेतनही कापण्यात आले आहे.  महापालिकेच्या वतीने सहायक आरोग्याधिकारी तथा उपआयुक्त डॉ. सचिन हिरे, तसेच सर्व विभागीय अधिकारी यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत.शहरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने टीका होत होती. विशेषत: गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाची पिसे काढली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१३) महापालिकेच्या सर्व खाते प्रमुखांसह अन्य अधिकाºयांना प्रभागात अचानक भेट देण्याचा प्रयोग राबविण्यात आला. सकाळी सहा ते सात या वेळात किती कर्मचारी आले तसेच स्वच्छता केली किंवा नाही यासाठी सर्व सफाई कामगारांच्या हजेरी शेडला भेटी देण्यात आल्या यावेळी सुमारे महापालिकेच्या एकूण सफाई कामगारांच्या संख्येच्या तुलनेत २५ टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे प्रशासनाला आढळले होते. १६० कर्मचारी विनापरवाना गैरहजर होते तर २०७ कर्मचारी हे पूर्वपरवानगीने रजेवर होते. प्रभाग क्रमांक २३ मध्ये तर एका कर्मचाºयाच्या जागेवर बोगस कर्मचारी काम करताना आढळला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाईचा धडाका सुरू झाला.आरोग्याधिका-यांना नोटीसमहापालिकेचे सहायक आरोग्याधिकारी तथा उपआयुक्त डॉ. सचिन हिरे यांच्याकडून कनिष्ठ कर्मचाºयांवर जम्बो कारवाई करण्यात आली असली तरी डॉ. हिरे यांनाही नोटीस बजावली जाणार आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख असल्याने त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक