तीन संशयितांवर कॉपीराईट अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 30, 2014 00:38 IST2014-11-30T00:37:51+5:302014-11-30T00:38:17+5:30

महात्मा गांधी रोडवर बनावट मोबाइलची विक्री

Three suspects have filed an offense under the Copyright Act | तीन संशयितांवर कॉपीराईट अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल

तीन संशयितांवर कॉपीराईट अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल

  नाशिक : मोबाइलचे दुकान टाकून ग्राहकांना बनावट मोबाइल विक्र ी करणाऱ्या तिघा संशयितांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात कॉपी राईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कर्नाराम भलाजी देवाशी, जितेश कुमार तोतराम चौधरी (२३) आणि दलपतिसंग मोहनिसंग राठोड अशी या तिघांची नावे आहेत. विनोद काशीनाथ नाईक (रा. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी महात्मा गांधी रोडवरील प्रधान पार्क येथे वेगवेगळ्या ठिकाणी मोबाइलचे दुकान टाकून ग्राहकांना बनावट मोबाइलचा माल विक्र ी केला होता. त्यामुळे नाईक यांनी कॉपी राईट कायद्यान्वये या तिघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three suspects have filed an offense under the Copyright Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.