चोरीच्या वाहनासह तिघा संशयिताना अटक
By Admin | Updated: July 24, 2014 01:00 IST2014-07-23T23:25:03+5:302014-07-24T01:00:47+5:30
पोलिसांची कारवाई : ऐवज जप्त करण्यात यश

चोरीच्या वाहनासह तिघा संशयिताना अटक
सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावर भोकणी शिवारात चालकाला शिवीगाळ व दमदाटी करून पळविण्यात आलेली मॅक्झिमो गाडी तिघा संशयित चोरट्यासह ताब्यात घेण्यात वावी व सिन्नर पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश मिळाले.
गेल्या चार दिवसांपूर्वी ंमॅक्झिमो गाडीत बसलेल्या अज्ञात चार चोरट्यांनी लघुशंकेसाठी थांबण्याचा बहाणा करुन चालक सादीक मामूद सदाव याला दमदाटी व शिवीगाळ करीत गाडीखाली ढकलून त्याच्या ताब्यातील महिंद्र मॅक्झीमो गाडी पळवून नेली होती. नाशिक-पुणे महामार्गाावरील मुंडेगाव येथे कॉफी व आइस्क्रीमचा माल खाली करुन मॅक्झीमो गाडी चालक सदाव हा शिर्डीकडे जात असतांना नाशिकजवळ चार अज्ञात युवक त्याच्या गाडीत शिर्डीला जाण्यासाठी बसले होते.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. रसेडे यांनी तपासाची सूत्रे फिरवली होती. वाडीवऱ्हे शिवारात सदर गाडी असल्याची खबर रसेडे यांना मिळाली होती. त्याआधारे रसेडे यांनी हवालदार अतुल फलके, रवींद्र वालखेडे, तुषार ढगे, सचिन करंडे यांच्यासह वाडीवऱ्हे शिवारात साईढाबा गाठला. याठिकाणी संशयित आरोपी काशिनाथ गोरे, संदीप सोनवणे, बबन शेंडगे (रा. मुंडाळे ता. इगतपुरी) हे गाडीचे टायर बदलत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या तिघा संशयितांना अटक करून चोरीला गेलेली गाडी ताब्यात घेतली आहे. (वार्ताहर)