घरफोडी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक
By Admin | Updated: November 13, 2014 00:33 IST2014-11-13T00:33:15+5:302014-11-13T00:33:32+5:30
सराईत गुन्हेगार : तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक
इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याचे घरफोडी व दरोडा प्रतिबंधक पथक व गुन्हे शोधपथकाने घरफोडी करीत असताना तीन संशयित आरोपींना तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. यामुळे घरफोडीस आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीनही संशयित सराईत व यादी वरील गुन्हेगार आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्या होत होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमागवर यांनी काही कर्मचारी घेऊन स्वत:च घरफोडी व दरोडी प्रतिबंधक पथक तयार केले आणि रात्रीची गस्ती सुरू केली. त्यानुसार पहाटे अडीच वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमानवर व कर्मचारी गस्त घालत. पाथर्डी फाटा परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी आंगण हॉटेल लगत असलेल्या भंगार दुकानाजवळ एक चारचाकी वाहन उभे होते आणि त्याच्याजवळ दोन संशयित इसम उभे होते. तसेच भंगार दुकानाचे शटरही अर्धवट स्थितीत उघडे होते. त्यांना हटकले असता त्यांच्यातील एकजण भंगार दुकानातील भंगार पोत्यात भरत होता. तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले. त्यावेळी तातडीने गुन्हेशोधक पथकास घटनास्थळी बोलाविण्यात आले.
यावेळी भगवान रामदास गाढवे (३५), रा. देवळाली गाव, जावेद रज्जाक शेख (२१) रा. द्वारका व उत्तम नामदेव भालेराव (२९) रा. देवळालीगाव या तिघाही सुराईत गुन्हेगाराकडून (एमएच १५ डीसी ९७८६) चारचाकी व १०० किलो भंगार असा सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जमील शेख व कर्मचारी होते. (वार्ताहर)