घोटीतील चोऱ्यांप्रकरणी तिघे संशियत जेरबंद

By Admin | Updated: August 14, 2016 01:45 IST2016-08-14T01:44:39+5:302016-08-14T01:45:35+5:30

घोटीतील चोऱ्यांप्रकरणी तिघे संशियत जेरबंद

Three suspected robbers in Ghoti | घोटीतील चोऱ्यांप्रकरणी तिघे संशियत जेरबंद

घोटीतील चोऱ्यांप्रकरणी तिघे संशियत जेरबंद

 घोटी : शहरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या घरफोडी व धाडसी चोऱ्यांबाबत घोटी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा शाखेने गंभीर पाऊले उचलली असून दोन दिवसांपूर्वी व तत्पूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश मिळविले असून अवघ्या काही तासांतच यातील संशियतांना जेरबंद केल आहे.
याबाबत स्थानिक गुन्हा शाखेच्या विभागाने तीन संशियतांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित तिघे संशियत फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान ताब्यात घेतलेल्या संशयीतांनी चोरी केल्याची कबुली दिली असून पोलीस इतर संशियतांचा शोध घेत आहेत. घोटी शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धाडसी चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनेत मोठया प्रमाणात वाढ झाली होती.या चोऱ्यांचा छडा लावण्याचे गंभीर आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते. दरम्यान शुक्रवारी घोटी शहरातील दुर्गा नगर व इतर ठिकाणी घरफोडीचे प्रकार होऊन तीन लाखांचा ऐवज लंपास झाला होता. या संशियतांकडून चोरी झालेल्या गॅसचे दोन सिलेंडर,एक एमएच.१५,इ. डी.५१८६ क्र मांकाची दुचाकी, चांदीचे जोडवे, मासूळी व नथ असा ऐवज ताब्यात घेतला आहे. यातिल तिघे संशियत फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरटे जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप झाल्टे,श्रीकांत देशमुख, प्रित्तम लोखंडे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखा करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Three suspected robbers in Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.