आठवड्यात तिघांच्या आत्महत्त्या

By Admin | Updated: November 16, 2015 22:41 IST2015-11-16T22:40:48+5:302015-11-16T22:41:22+5:30

कर्जबाजारीपणा : महिलेचा समावेश

Three suicides in the week | आठवड्यात तिघांच्या आत्महत्त्या

आठवड्यात तिघांच्या आत्महत्त्या

नाशिक : गेल्या आठवड्यात सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू असताना, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्णातील तिन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करून मुत्यूला कवटाळले. विशेष म्हणजे ५० पैशांहून अधिक पैसेवारी असलेल्या नाशिक तालुक्यातील शेतकऱ्याचा यात समावेश असून, गेल्या अकरा महिन्यांत जिल्ह्णात ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत.
नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथील विश्राम विठोबा ठुबे (३१) याने नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्त्या केली, त्यानंतर पाडव्याच्या दिवशी मालेगाव तालुक्यातील हिसवाळ येथे राहणाऱ्या दगडू त्र्यंबक चव्हाण (६५) या वृद्ध शेतकऱ्याने घरातच विष प्राशन केले, तर रविवारी दुपारी बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथे राहणारी संगीता त्र्यंबक सूर्यवंशी (३६) या महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आत्महत्त्या केलेल्या तिघेही नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. नोव्हेंबर महिन्यात सोमवारपर्यंत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली असून, जिल्ह्णात आजपावेतो आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६७ वर पोहोचली आहे.

Web Title: Three suicides in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.