विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:42 IST2018-10-11T00:37:03+5:302018-10-11T00:42:28+5:30

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

Three suicides in the district by consuming poisonous drugs | विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

विषारी औषध सेवन करून जिल्ह्यात तिघांची आत्महत्या

ठळक मुद्दे दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते.

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर, हरसूल व दिंडोरी तालुक्यातील तिघांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून, या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील सतरा वर्षीय रेखा भगवान आंबोरे या तरुणीने मंगळवारी (दि़९) सकाळी उंदीर मारण्याचे औषध सेवन केले़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिचा भाऊ गौतम आंबोरे याने तत्काळ बिटको व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि़१०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
हरसूल तालुक्यातील खोडची वाडी येथील विवाहिता चित्रा संजय खाडे (२६) हिने बुधवारी (दि़१०) सकाळी विषारी औषध सेवन केले़ ही बाब लक्षात येताच तिचे पती संजय खाडे यांनी गिरणारे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ या घटनेची हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील वैभव विष्णू वाघ (२३) या तरुणाने मंगळवारी (दि़९) सकाळी विषारी औषध सेवन केले़ त्यास वडील विष्णू वाघ यांनी तत्काळ दिंडोरी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्याचा
मृत्यू झाला़ या घटनेची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़जवळकी येथील शेतकऱ्याची आत्महत्या नांदगाव : तालुक्यातील जवळकी येथील तरु ण शेतकरी काशीनाथ श्रावण गायकवाड (५०) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी (दि.९) सकाळी ११ वाजता कपाशी पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे बंधू प्रकाश यांनी दिली. काशीनाथ गायकवाड यांना तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी
डॉ. उस्मान घोडके यांनी प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील शासकीय घाटी रु ग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविले होते. तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले, दोन भाऊ, सहा पुतणे, दोन बहिणी असा परिवार आहे.
काशीनाथ यांनी वडील श्रावण चिंधा गायकवाड यांच्या नावावर असलेली शेतजमीन गट नंबर ५०८/२ क्षेत्र ४ हेक्टर १८ गुंठे या जमिनीवर बोलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजार रु पये पीक कर्ज घेतले होते. त्याचे व्याज ३२,७०० रु पये कालपर्यंत झाले होते. त्यांनी वडिलांच्या नावावर घेतलेले कर्ज कर्ज माफी योजनेअंतर्गत माफ झालेले नसल्याची माहिती सोसायटीचे सचिव कैलास कर्ने यांनी दिली. त्यांचा लहानभाऊ कैलास लहानपणापासून अपंग आहे.

Web Title: Three suicides in the district by consuming poisonous drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.