वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्त्या
By Admin | Updated: August 26, 2016 23:49 IST2016-08-26T23:49:35+5:302016-08-26T23:49:58+5:30
वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्त्या

वेगवेगळ्या ठिकाणी तिघांची आत्महत्त्या
नाशिक : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेल्या तिघांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना मंगळवारी (दि़ २३) घडल्या आहेत़ यामध्ये दोन पुरुषांसह एका युवतीचा समावेश आहे़
पहिली घटना पळसे येथील जाधव संकुलमध्ये घडली़ येथील भूषण भास्कर गायधनी (२४) या युवकाने सोमवारी (दि़ २२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ ही बाब मंगळवारी (दि़ २३) सकाळी त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़
आत्महत्त्येची दुसरी घटना उपनगरमधील काशीप्रयाग बंगल्यात मंगळवारी (दि़ २३) दुपारी दीडच्या सुमारास घडली़ येथील मयुरी अंबादास गुट्टे या २३ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ तिच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ आत्महत्त्येची तिसरी घटना गौळाणे रोड परिसरातील वझरे मळा परिसरात घडली़ संदीप अर्जुन घेतक (३४) या युवकाने मंगळवारी (दि़ २३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़