सुवर्ण जयंती एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या तीन घटना
By Admin | Updated: June 21, 2017 00:20 IST2017-06-21T00:19:46+5:302017-06-21T00:20:04+5:30
सुवर्ण जयंती एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या तीन घटना

सुवर्ण जयंती एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या तीन घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : निजामुद्दीन-म्हैसूर सुवर्ण जयंती एक्स्प्रेसच्या क्रमांक तीनच्या आरक्षित बोगीत प्रवाशांच्या पर्स चोरीच्या तीन घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मनमाड ते भुसावळदरम्यान धावत्या गाडीत माया राजेंद्र रस्तोगी, रा. उत्तर प्रदेश, सुरेंद्र चंदेल, रा, दिल्ली, रेखा राजकुमार परेवल, रा. उत्तराखंड या महिला प्रवाशांच्या पर्स चोरट्यांनी लांबविल्या. यात रोख रक्कम व मोबाइल संच असा ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मनमाड रेल्वेस्थानकात गाडी आल्यानंतर सदर प्रकार निदर्शनास आला.
या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.