सिनेस्टाईल पाठलाग करत तिघे दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:30+5:302021-09-26T04:15:30+5:30

पिंपळगाव बसवंत : रानमळा लोणवाडी शिवारात धारदार शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा चोरट्यांपैकी तीन सराईत चोरांना पकडण्यात पिंपळगाव ...

Three robbers chased in cinestyle chase | सिनेस्टाईल पाठलाग करत तिघे दरोडेखोर जेरबंद

सिनेस्टाईल पाठलाग करत तिघे दरोडेखोर जेरबंद

पिंपळगाव बसवंत : रानमळा लोणवाडी शिवारात धारदार शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा चोरट्यांपैकी तीन सराईत चोरांना पकडण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना यश आले आहे. या तिघांकडून दरोडा टाकण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. त्यात एक मोबाईल, चाॅपर, गज, मिरचीची पूड, वेळूच्या काठ्या, नायलॉन दोरी, कोयता आदी ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव शहरात गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग पथकातील पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे आणि पोलीस काॅन्स्टेबल नितीन जाधव, संदीप दराडे, मिथुन घोडके हे दुचाकीवरुन गस्त घालत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे यांना मध्यरात्रीच्या सुमारास रानमळा लोणवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत काही चोरटे धारदार शस्त्र घेऊन वावरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांसह उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, पोलीस काॅन्स्टेबल तुषार झालटे, शांताराम निंबकर, राकेश धोंडगे, यांनी शासकीय वाहनांतून घटनास्थळ गाठले. पोलिसांना बघून काही आरोपींनी पळ काढला. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे यांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी मोहित भास्कर गांगुर्डे, मुकुंद गणपत देशमुख, रोहित केशव गायकवाड यांना पकडण्यात यश मिळवले. मात्र, त्यांच्यामधील आरोपी मुज्या उर्फ दानिश सरफराज शेख, बापू उर्फ प्रतीक पांडुरंग मातेरे, भूषण उर्फ स्वप्नील सुनील गोसावी आदी पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याविरोधात पोलीस काॅन्स्टेबल नितीन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-----------------------

मुद्देमाल हस्तगत

या चोरट्यांकडून ११ हजारांचा मोबाईल, लोखंडी धारदार चाॅपर, तीन फूट लांबीचा गज, मिरची पूड पाकीट, लोखंडी पात्याचा कोयता, वेळूच्या काठ्या, नोयलॉन दोरी आदी ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. (२५ पिंपळगाव चोर)

250921\25nsk_4_25092021_13.jpg

२५ पिंपळगाव चोर

Web Title: Three robbers chased in cinestyle chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.