शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात तीन दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:52 IST

वाहनांवर तुफान दगडफेक करून तलवारी व गजांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, दोघे फरार आहेत. हा खळबळजनक प्रकार सटाणा -नामपूर रस्त्यावरील कºहे गावाजवळ गुरुवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला.

सटाणा : वाहनांवर तुफान दगडफेक करून तलवारी व गजांचा धाक दाखवून लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, दोघे फरार आहेत. हा खळबळजनक प्रकार सटाणा -नामपूर रस्त्यावरील क-हे गावाजवळ गुरुवारी (दि.१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडला. हे पाचही दरोडेखोर कºहे येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.गुरु वारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नामपूर-सटाणा रस्त्यावरील कºहे गावानजीकच्या गणपती नाल्यावर दगडगोटे आणि झाडांच्या फांद्या रस्त्यावर टाकून पाच बुरखाधारी दरोडेखोरांनी येणाºया जाणाºया वाहनांवर तुफान दगडफेक करून तोडफोड करून धुडगूस घातला होता. यापूर्वी कुपखेडा गावाचे पोलीसपाटील बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला चढविला मात्र ठाकरे यांनी प्रतिकार करून हल्ला परतवून लावला, तर डॉ.अमोल पवार यांचे आईवडील नामपूरकडे जात असताना त्यांच्या कारवरही हल्ला करून दांपत्याला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. बारा ते तेरा वाहने फोडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी पाच जणांविरु द्ध दरोड्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला  असून, त्यांच्याकडून तलवार, गज, मिरचीची पूड जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील करीत आहेत.महिलांसह पाच जणांना बेदम मारहाणसंशयितांनी तलवार आणि गजांचा धाक दाखवून जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विश्वास भामरे यांची स्विफ्ट डिझायर कार अडविली. यावेळी कारमधील दोन महिलांसह पाच जणांना बेदम  मारहाण करून अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असताना गस्तीवर असलेल्या सटाणा  पोलिसांनी त्यांची दरोडेखोरांपासून सुटका केली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच पैकी तीन जणांना पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. दोघे दरोडेखोर मात्र पळून  जाण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा