घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: March 3, 2017 01:46 IST2017-03-03T01:46:04+5:302017-03-03T01:46:22+5:30
नाशिकरोड : उपनगर पोलिसांनी तिघा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक
नाशिकरोड : उपनगर पोलिसांनी तिघा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
उपनगर उत्तरानगरलेन भूमिधर अपार्टमेंटमधील दमयंतीबेन अमृतभाई रुदानी यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोंडा तोडून गेल्या २ जानेवारी रोजी ९७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना उपनगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित सुरेश राजाराम म्हस्के, रा. पिंटो कॉलनी जेलरोड, बाळू ऊर्फ चंद्रकांत काशीनाथ थोरात रा. वणी, ता. दिंडोरी, सनातन शीतल जाना, रा. लक्ष्मण अपार्टमेंट, गणेशवाडी, पंचवटी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी उपनगर व पंचवटी भागांत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच तोळे सोन्याची लगड, चार तोळे चांदीची लगड असा एक लाख ११ हजार ७०० रुपयांचा ऐवज व
पंचवटीच्या गुन्ह्यातील पाच हजार २४० रुपयांचे कॉस्मेटिक सामान जप्त केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखा पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, उपनिरीक्षक जी. आर.
जाधव, जी. एफ. इंगळे, अशोक साळवे, मांदळे, के. टी. गोडसे, व्ही. व्ही. गवांदे, के. के. देशमुख,
आर. टी. भावले, एम. डी. जाधव, व्ही. के. गिते, एस. आर. काकड, पी. बी. ठाकूर आदिंनी उघडकीस आणला आहे. (प्रतिनिधी)