शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

त्र्यंबकच्या शिवलिंगावरील बर्फाची करामत पुजाऱ्यांच्या अंगलट; व्हायरल सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 06:27 IST

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले.

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या शिवलिंगात बर्फ जमा झाल्याने जणू बाबा अमरनाथच अवतरल्याची चर्चा सुरू झाली. कुणी चमत्काराचा दावा केला, तर कुणी ईशान्य भारतावर ही संकटाची चाहूल असल्याची साठा उत्तराची कहाणी ऐकविली. व्हायरल व्हिडीओने विज्ञानवादी चक्रावले. अंनिसही पुढे सरसावली. अखेर चौकशी समितीतून सात महिन्यांनंतर व्हायरल सत्य समोर आले असून, देवस्थानातील तीन पुजाऱ्यांनीच हा सारा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. तिघा पुजाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकराजाच्या पिंडीत ३० जून २०२२ रोजी  बर्फ झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. जून महिन्यात पिंडीत बर्फ झालाच कसा, असा सवालही उपस्थित होऊ लागला.  मात्र, विज्ञान अभ्यासकांनी हा दावा खोडून काढला तर महाराष्ट्र अंनिसने सत्यशोधनाची मागणी केली होती. देवस्थानने सत्यशोधनासाठी विश्वस्तांची चौकशी समिती नेमली. समितीने सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच हवामान खात्याचाही अहवाल मागविला.

त्यांनीच बर्फ टाकला, व्हिडीओ व्हायरल केला - हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पिंडीत बर्फ होऊच शकत नसल्याचा निर्वाळा दिला. समितीच्या अहवालानुसार, देवस्थानातील तुंगार मंडळातील तिघा पुजाऱ्यांनीच शिवलिंगात बर्फ टाकत त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आले. 

-जाधव यांनी पोलिस ठाण्यात संशयित पुजारी सुशांत तुंगार, आकाश तुंगार व उल्हास तुंगारविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

यामुळे देवस्थानच्या कीर्तीला बाधा पोहोचते. देवस्थानच्या एका घटकांकडून ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराचा नावलौकिक खराब होणे, ही बाब दुर्दैवी आहे. - प्रशांत गायधनी, विश्वस्त,     त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

हा भाविकांच्या श्रद्धेशी केलेला खेळ आहे. गुन्हा नोंद व्हायला आठ महिने का लागले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावण्याची विनंती पोलिस प्रशासनाला करण्यात येत आहे.- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिक