विवाहितेच्या आत्महतेप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST2021-06-30T04:10:07+5:302021-06-30T04:10:07+5:30
पेठरोडवरील तुळजाभवानी नगर फ्लोरा हाईट येथे राहणाऱ्या पल्लवी बलराम माचरेकर (२७) हिने शनिवारी रात्री राहत्या घरी काहीतरी विषारी औषध ...

विवाहितेच्या आत्महतेप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
पेठरोडवरील तुळजाभवानी नगर फ्लोरा हाईट येथे राहणाऱ्या
पल्लवी बलराम माचरेकर (२७) हिने शनिवारी रात्री राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. मयत विवाहिता पल्लवीने गाळा घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपयांची रक्कम आणावी यासाठी संशयित आरोपी पती बलराम राजू माचरेकर, विमल माचरेकर (सासू) आणि राजू दीपक माचरेकर आदींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. सासरकडच्या मंडळींकडून पैशांसाठी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून अखेर विवाहिता पल्लवीने राहत्या घरात शनिवारी रात्री काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सासरकडच्या मंडळींकडून पैशांसाठी तगादा लावला जात असल्याने मयत पल्लवी हिच्या वडिलांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.