तिघांनी गळफास घेऊन आत्महत्त्या

By Admin | Updated: June 28, 2015 01:53 IST2015-06-28T01:53:15+5:302015-06-28T01:53:42+5:30

तिघांनी गळफास घेऊन आत्महत्त्या

Three people commit suicide | तिघांनी गळफास घेऊन आत्महत्त्या

तिघांनी गळफास घेऊन आत्महत्त्या

नाशिक : शहर परिसरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे़ यामध्ये एक महिला, एक पुरुष व एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे़ गंगापूररोडवरील सृष्टी सहवास कॉम्प्लेक्समधील रहिवासी सोनाली सचिन चव्हाण (३६) या विवाहितेने शुक्रवारी (दि़२६) सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील बेलतगव्हाण येथील रहिवासी प्रेरणा गोरख सूर्यवंशी (१६) या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ तिच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ उपनगर परिसरातील अयोध्यानगरमधील रहिवासी अर्जुनसिंग डोंगरसिंग भाटी (४९) यांनी शुक्रवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांच्या आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Three people commit suicide