छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: September 12, 2014 00:41 IST2014-09-12T00:41:47+5:302014-09-12T00:41:47+5:30
छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक

छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक
नाशिक : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सदिच्छानगर येथे मुलीची छेड काढल्याची व तिच्या शेजारच्या युवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदिच्छानगर येथे राहणाऱ्या मुलीची संशयित अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वी छेड काढली होती व त्या मुलीला त्रास देत होता. याबाबत मुलीच्या आईने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना शिवीगाळ केली व काही साथीदारांना बोलावून मुलीच्या शेजारी असलेला राजेष मल्लना मुदीगवडर (१९) व त्याचा मित्र शंतनू पाटील यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मुदीगवडर याने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गफ ारमामा, नितीन पाटील, राजू डाखोरे यांच्यासह एका अल्पवयीन व त्यांच्या अज्ञात पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन संशयितासह गफारमामा, राजू डाखोरे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, नितीनसह अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.