मालेगाव : येथील मुंबई - आग्रा महामार्गावर सवंदगाव शिवारात आराम बसने मालट्रकला दिलेल्या धडकेत बसमधील एरंडोलचे तीन प्रवासी जखमी झाले. तसेच दोन्ही गाड्यांचे मिळून दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे हा अपघात झाला. याप्रकरणी पोलीस जमादार टी.आर. खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चद्रकांत लक्ष्मण हाटकर (३०), राजेंद्र हिरालाल चौधरी (३९) व गोपाल देवीदास लांडगे (२९) ही जखमी प्रवाशांची नावे आहेत. पुढील तपास जमादार खैरनार करत आहेत.
बस-मालट्रकच्या धडकेत तीन प्रवासी जखमी
By admin | Updated: July 6, 2014 00:14 IST