धनादेश न वटल्याप्रकरणी तीन महिने शिक्षा
By Admin | Updated: May 16, 2014 00:43 IST2014-05-16T00:34:34+5:302014-05-16T00:43:55+5:30
नाशिक : कस्टम विभागातील वकिलाला फ ीच्या रकमेपोटी दिलेला धनादेश न वटल्याने एका कंपनीमालकाला ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायाधीश श्वेता चांडक यांनी दिली़ २००९ पासून हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़

धनादेश न वटल्याप्रकरणी तीन महिने शिक्षा
नाशिक : कस्टम विभागातील वकिलाला फ ीच्या रकमेपोटी दिलेला धनादेश न वटल्याने एका कंपनीमालकाला ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाची शिक्षा न्यायाधीश श्वेता चांडक यांनी दिली़ २००९ पासून हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़
याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळी येथील अमीर हीना लॅबोरेटरीज या कंपनीचे मालक जे़ बी़ शर्मा (रा़ फ रिदाबाद, दिल्ली) यांनी कस्टम न्यायालयात वकिली करणारे ॲड़ प्रदीप गणपत कोरडे यांना सर्व्हिस टॅक्स, ऑडिट, रिटर्न, एक्सपोर्ट परमिशन, बँक गॅरंटी, ॲनेक्सर ४५ सर्टिफि केटचे काम दिले़ हे काम करण्यासाठी २७ हजार रुपये वकील फ ी ठरली़ त्यानुसार शर्मा यांनी कोरडे यांना या रकमेचा चेक दिला़ ॲड. कोरडे यांनी शर्मा यांचे कस्मट कोर्टातून ही कामे करून दिली़
कंपनीमालक शर्मा यांनी दिलेला २७ हजार रुपये रकमेचा धनादेश न वटल्याने ॲड़ कोरडे यांनी रकमेची मागणी केली़ परंतु त्यास नकार मिळाल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला़ यामध्ये न्यायालयाने शर्मा यांना वारंवार रक्कम देण्याचे व तडजोड करण्यास सांगितले़ मात्र शर्मा यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत तारखांनाही हजेरी लावली नाही़
दरम्यान, या खटल्यात न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार न्यायाधीश श्वेता चांडक यांनी आरोपी जे़ बी़ शर्मा यास ५४ हजार रुपये दंड व तीन महिने कारावास, दंड न भरल्यास आणखीन तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली़ तसेच सुनावणीला हजर न राहिल्याप्रकरणी शर्माविरोधात वॉरंट काढण्यात आले आहे़ या खटल्यात कोरडे यांच्या वतीने ॲड़ राहुल वसंत पाटील-काकड यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)