शहरात तिघा पुरुषांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:07 IST2021-05-04T04:07:22+5:302021-05-04T04:07:22+5:30

अंबड औद्योगिक वसाहतीत राहणारा दीपक कटवारू शर्मा (२०) याने रविवारी (दि.२) सायंकाळी राहते घरी छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन ...

Three men commit suicide in the city | शहरात तिघा पुरुषांची आत्महत्या

शहरात तिघा पुरुषांची आत्महत्या

अंबड औद्योगिक वसाहतीत राहणारा दीपक कटवारू शर्मा (२०) याने रविवारी (दि.२) सायंकाळी राहते घरी छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन घेत आत्महत्या केली. या प्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत सिन्नरफाटा परिसरातील भोर मळा येथील रामचंद्र मधुकर फोकणे (३६) यांनी राहते घरी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोरीच्या साहाय्याने छतास गळफास घेऊन घेत आत्महत्या केली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

तिसऱ्या घटनेत अंबडच्या आंबेडकरनगर येथील शंकर भिकाजी साळवे (४५) यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने छताच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three men commit suicide in the city