मालेगाव: जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मालेगावातील सराईत गुन्हेगार कलीमनानासह तिघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांसह जेरबंद केले असून त्यांचे विरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे आणि अपर पोलिस प्रमुख निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात कलीम अहमद मन्सूर अहमद उर्फ कलीमनाना (३६) रा. खलील हायस्कूल जवळ मोहंमदाबाद ,मालेगाव तसेच निलेश संजय मोरे (१९) हिंमतनगर, गल्ली नंबर ७ मालेगाव आणि सईद अली शेरअली(३४)रा. अखतराबाद यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे व धारदार कोयता अशी घातक शस्त्रे तसेच मोबाईल फोन,पिकअप वाहन (क्रमांक एमएच ०४- बीयू-४४८८) व मिराज तंबाखूचे बॉक्स असा एकून तीन लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचेविरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मनमाड येथील एक गोदाम फाडून घरफोडी केल्याची कबुली दिली.घातक शस्त्रेही ताब्यातबुधवारी (दि.१७) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मुंबई- आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना मालेगावातील काही सराईत गुन्हेगार घातक शस्त्र बाळगून मुंबईकडून मालेगावकडे येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात सापळा रचला. टोलनाक्याच्या दिशेने येत असलेली सफेद रंगाची पिकअप गाडी पोलिसांनी अडवली. सदर वाहनावरील चालक व दोन संशयिताना जागेवरच ताब्यात घेतले.
मालेगावचा सराईत गुन्हेगार कलीमनानासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:04 IST
गावठी कट्टा जप्त : पिंपळगाव बसवंत येथे पोलिसांची कारवाई
मालेगावचा सराईत गुन्हेगार कलीमनानासह तिघांना अटक
ठळक मुद्देआरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मनमाड येथील एक गोदाम फाडून घरफोडी केल्याची कबुली दिली.