शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

हिंगणवेढे शिवारात तीन बिबट्याची पिल्ले आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:22 PM

हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले पाठोपाठ जातांना नजरेस पडले होते.

ठळक मुद्देवावर वाढला : पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये घबराट

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : हिंगणवेढे शिवारात बिबट्याची मादी व तिच्या पिलांचा वावर आढळून आल्याने दिवसा ढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असतानाच जाखोरी-हिंगणवेढा शिवारात उसाच्या शेतात नुकतीच जन्मलेली बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. त्यामुळे या परिसरात ४ ते ५ बिबट्यांचा वावर असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले पाठोपाठ जातांना नजरेस पडले होते. एकलहरे शिवरस्ता व हिंगणवेढे शिवारातील बहुतेक ठिकाणी उसतोड झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे त्याचे अन्यत्र वास्तव्य वाढले असून, परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसादेखील एकटे दुकटे फिरण्यास शेतकरी धजावत नसून, गेल्याच आठवड्यात जाखोरी चांदगिरी रस्त्यावर लागोपाठ दोन दिवस बिबट्याने दुचाकी स्वारांना झडप घालून जायबंदी केले आहे. या संदर्भात वारंवार वन खात्याला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.हिंगणवेढे व जाखोरी शिवारातच सध्या बºयापैकी उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी व सुरक्षिततेसाठी जागा असल्याने तेथील एका उसाच्या शेतात नुकतीच जन्मलेली बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. त्यामुळे या भागात बिबट्यांच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांची संख्या ४ ते ५ असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक