तीन लाखांचा लाकूड साठा जप्त
By Admin | Updated: July 25, 2014 00:26 IST2014-07-24T23:01:43+5:302014-07-25T00:26:30+5:30
तीन लाखांचा लाकूड साठा जप्त

तीन लाखांचा लाकूड साठा जप्त
वणी : बेकायदा लाकडाचा साठा बाळगून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना वनविभागाने या ठिकाणी धाड टाकून तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, सदर ऐवज वनविभागाच्या डेपोमध्ये ठेवण्यात आला आहे.
कृष्णगाव येथे तिलकराम नामक परप्रांतीय गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदा लाकडांचा साठा करून सदर मालाची विल्हेवाट लावत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी बी. जी. अहिरे, एम. डी. बोरसे, सोनार, एम. जी. सोमण, दळवी, मोगरे, चौरे, आर. एच. देवरे, एस. पी. निरभवणे, हिरे, महाले, पटेल, संपकवाड या वनविभागाच्या पथकाने पाळत ठेवून कृष्णगाव येथे धाड टाकून तीन लाख रुपयांची बेकायदा लाकडांचा साठा तसेच कटर मशीन, ग्रार्इंडर, रंधा मशीन व इतर तत्सम साहित्य जप्त केले. दरम्यान अनेक परप्रांतीय व्यापाऱ्यांची साखळी असून बेकायदा लाकडांची खरेदी-विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. मात्र सातत्याने याकडे काणाडोळा झाल्याने तक्रारी वाढल्याने त्याची परिणीती या कारवाईत झाल्याची चर्चा परिसरात आहे. (वार्ताहर)