उंबरठाणमध्ये तीन लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By Admin | Updated: June 8, 2015 00:05 IST2015-06-08T00:05:11+5:302015-06-08T00:05:31+5:30

विभागीय भरारी पथकाची कामगिरी : दोन कार जप्त, एकास अटक

Three lakhs of illegal ammunition seized in the threshold | उंबरठाणमध्ये तीन लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

उंबरठाणमध्ये तीन लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : दमणनिर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला सुमारे तीन लाखांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने शनिवारी (दि़६) सुरगाणा तालुक्यात पकडला़ यामध्ये एका संशयितास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन कार व अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे़
महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली दमणनिर्मित किंगफिशर बिअर व जॉन मार्टिन व्हिस्कीची सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथून अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती नाशिकच्या विभागीय भरारी पथकाला मिळाली़ त्यानुसार या ठिकाणी सापळा लावून दोन कार (जीजे १५ सी ४४८२ व एमएच ०१, जीए ४५१६) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये बिअरचे २४ बॉक्स, तर व्हिस्कीचे २२ बॉक्स आढळून आले़
या पथकाने संशयित हंसराज सीताराम पवार (२२, रा़ अलंगुन मोकपाडा, ता़ सुरगाणा, जि़ नाशिक) यास अटक केली असून, मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन्ही कार व त्यामधील २ लाख ८८ हजार ८४० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे़ विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक पी़ एऩ पाटील, दुय्यम निरीक्षक आऱ आऱ धनवटे, वाय़ आऱ सावखेडकर, व्ही़ एम़ माळी, जवान महेंद्र बोरसे, सुनील टापरे, दीपक गाडे, किरण कदम, रोहित गांगुर्डे यांनी ही कारवाई केली़
नाशिक आणि गुजरातच्या सीमेवर अवैधरितीने मद्य आणण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे या परिसरात भरारी पथक कायमच तैनात असते. (प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of illegal ammunition seized in the threshold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.