नोकराने केला तीन लाखांचा अपहार
By Admin | Updated: March 18, 2017 21:47 IST2017-03-18T21:47:33+5:302017-03-18T21:47:33+5:30
बॅटरी डिलरने पैसे वसुलीसाठी ठेवलेल्या नोकराने छोट्या वितरकांकडून पैसे गोळा करून तीन लाखांचा अपहार केल्याचा प्रकार

नोकराने केला तीन लाखांचा अपहार
नाशिक : बॅटरी डिलरने पैसे वसुलीसाठी ठेवलेल्या नोकराने छोट्या वितरकांकडून पैसे गोळा करून तीन लाखांचा अपहार केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि़ १७) उघडकीस आला़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थत्तेनगरमधील राजेंद्र मूलचंद गोठी हे शहरातील प्रमुख बॅटरी डिलर आहेत़ त्यांच्याकडे संशयित योगेश दत्तात्रय इक्कर ( १९ , रा़ महात्मानगऱ मूळ रा़ सातोना रोड, सेलू, परभणी) हा कामास असून तो वितरण व वसुलीचे काम करीत होता़ जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत योगेशने नाशिक शहर, भगूर व देवळाली या परिसरातील सबडिलरकडून २ लाख ९२ हजार २३२ रुपयांची वसुली केली़; मात्र ही रक्कम गोठी यांच्याकडे न देता त्याने रकमेचा अपहार केला़
याा प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात योगेशविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़