सिडकोत तीन लाखांची सुगंधित तंबाखू जप्त
By Admin | Updated: February 10, 2016 23:30 IST2016-02-10T23:30:05+5:302016-02-10T23:30:42+5:30
सिडकोत तीन लाखांची सुगंधित तंबाखू जप्त

सिडकोत तीन लाखांची सुगंधित तंबाखू जप्त
नाशिक : विनापरवाना सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह २ लाख ७२ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी (दि़९) अंबड पोलिसांनी जप्त केला आहे़ चारचाकी वाहनास (एमएच १५/सीके २९०२) पोलिसांनी अडविले़ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल ७१७ व व्ही़ एऩ तंबाखूचे पुडे आढळून आले़ या प्रकरणी वाहनचालक संतोष तुकाराम निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)