शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगाराकडून तीन लाखांचे दागिने, दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:38 IST

घरफोडी दुचाकी चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये अग्रेसर असलेल्या एक गुन्हेगाराला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे 3 लाख 30 हजाराचे लुटलेले दागिने, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.

सिडको : घरफोडी दुचाकी चोरी यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये अग्रेसर असलेल्या एक गुन्हेगाराला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे 3 लाख 30 हजाराचे लुटलेले दागिने, गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.अंबड पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये स्वामी नगर येथे मारहाण झाल्यामुळे व दुचाकी वाहनाची तोडफोड केल्यामुळे अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा गुन्हा झाल्यापासुन फरार होता. संशयित फरार आरोपी करण अण्णा कडुसकर (19 , रा. आनंद सागर फ्लॅट नंबर 1,अंबड) याचा शोध सुरू होता. कडुसकर हा अंबड गाव स्मशानभुमी जवळ येत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली असता गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन कडुसकर ला पकडले.संशयित आरोपीने त्याचे काही साथीदारासह निफाड गावामध्ये एका वकिलाच्या बंगल्यामध्ये घरफोडी व एक दुचाकी वाहनाची चोरी केल्याची कबुली दिली.खरेदीचा बनावकरत कार पळविलीनाशिकरोड : खरेदीचा व्यवहार पूर्ण न करताच बनावट किल्लीचा वापर करून दोन लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टागोरनगर साईकुटी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शिरीन रहीम पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे स्विफ्ट डिझायर (एमएच १२ जीके ४७२७) होती. त्या गाडीवर फायनान्सचे कर्ज होते. पठाण यांनी त्यांचे नातेवाईक संशयित समीर जलील शेख (रा. रेणुकानगर, द्वारका) यांना गाडी विकली. मात्र समीर याने कर्जाची हप्ते न फेडल्याने पठाण यांनी शेख यांच्याकडून घेतलेले पंचवीस हजार रु पये त्याला देऊन गाडी परत नेली. दि. १९ मे रोजी टागोरनगर येथे घरासमोर लावलेली गाडी शेख याने बनावट चावीने गाडी चोरून नेली. उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरफोडीत २२ हजारांचा ऐवज लंपासनाशिकरोड : जगताप मळा येथील पूजादीप हाऊस या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने २२ हजारांचा ऐवज चोरून गेला.जगताप मळ्यातील प्रदीप वासुदेव गोसावी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ जुलै रोजी बंगला बंद करून ते पत्नीसोबत मुंबईला गेले होते. दि. २५ आॅगस्ट रोजी ते घरी आले असता त्यांना खिडकीचा दरवाजा उघडा व गज कापलेले दिसले. चोरट्याने बंगल्यात घुसून सात साड्या, तीन शालू, स्पीकर असा २२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी