सातपूरच्या कंपनीतून तीन लाखांच्या तांब्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:16 IST2021-01-25T04:16:34+5:302021-01-25T04:16:34+5:30

नाशिक : सातपूरच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे तांब्याचे बंडल चोरणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या ...

Three lakh copper stolen from Satpur company | सातपूरच्या कंपनीतून तीन लाखांच्या तांब्याची चोरी

सातपूरच्या कंपनीतून तीन लाखांच्या तांब्याची चोरी

नाशिक : सातपूरच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे तांब्याचे बंडल चोरणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, या प्रकरणातील तिघाही संशयिताना वडाळा गावातून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसीन नबीयार खान (वय २८), गणेश रंगनाथ वाघमारे (वय २८) व मोसीन जाफर खान (वय २८) या तीन संशयिताना तांबे चोरीच्या प्रकरणात करण्यात आली आहे. सातपूर परिसरातील रेणुका ट्रान्सपोर्टच्या आवारातून तांब्याचे बंडल चोरीला गेले होते. याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस हवालदार गौरव गवळी यांना संशयितांविषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने वडाळा गावातून तिघाही संशयिताना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी तांब्याची चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Three lakh copper stolen from Satpur company