शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतील प्रवाशाची तीन लाखांची बॅग परत; लाख’मोलाचा प्रामाणिकपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 01:33 IST

वेतनाच्या आक्रोशातही या कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा एस.टी. विषयी विश्वासार्हता निर्माण करणारा ठरला आहे. 

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने दिवाळीच्या तोंडावर घरात अंधार पसरलेला. ड्युटी मिळेलच याचीही शाश्वती नाही. घामाच्या पैशांसाठी कुटुंबीयांसह एसटी कर्मचारी आक्रोश  आंदोलन करीत असताना बसमध्ये राहिलेली एका प्रवाशाची तीन लाखांची बॅग चालक व वाहकांनी  परत करून आपल्या कर्तव्याचे प्रामाणिक दर्शन घडविले. वेतनाच्या आक्रोशातही या कर्मचाऱ्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा एस.टी. विषयी विश्वासार्हता निर्माण करणारा ठरला आहे. 

रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वाडा आगाराची अक्कलकुवा बस नाशिकला दाखल झाली. त्यातून सुरेश सोहली हे प्रवासी उतरले आणि बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. काही वेळानंतर सोहली यांना आपली तीन लाख रुपये असलेली पैशांची बॅग बसमध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी वाहतूक नियंत्रक आर. एम. मथुरे यांना कळविले. 

मथुरे यांनी वाडा येथील आगाराशी संपर्क करून वाडा-अक्कलकुवा मालेगावमार्गे निघालेल्या वाहकाचा मोबाईल क्रमांक मिळविला.  वाहकाशी संपर्क करून  बसमधील बॅग ताब्यात घेण्यास सांगितले. बसमध्ये नवीन प्रवासी बसण्यापूर्वीच पैशांची बॅग वाहकाने ताब्यात घेतली. सोहली यांना मालेगाव येथे पाठविले.  तेथे त्यांना बसचे वाहक  गणेश आसाराम धनगर आणि चालक सदानंद आत्माराम  गुरव यांनी तीन लाख तीनशे रुपयांची रोकड असलेली बॅग परत केली. 

टॅग्स :Nashikनाशिक