शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:02 IST

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आडगाव, पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देचालक मनोजकुमार मयत झाला

नाशिक : परिसरातील आडगाव तसेच पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत आडगाव, पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम चौफुली येथे झालेल्या अपघातात औरंगाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कंटेनरने धडक दिली. या अपघातात कंटनेरचालक ठार झाला तर क्लिनर जखमी झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर (टी.एस ११ युसी ६२६१) उत्तर प्रदेश येथील चालक मनोजकुमार(२२) हा मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम चौफुलीवरून वळण घेत तारवालानगरकडे जात असताना त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. कंटनेर ट्रकवर पाठीमागून आदळला त्यात मनोजकुमार याच्या डोक्याला हातापायाला गंभीर मार लागल्याने मयत झाला तर क्लिनर सलुमुद्दीन कुतुबुद्दीन खान हा जखमी झाला आहे. अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत स्वत:च्या मृत्युस व क्लिनरच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मनोजकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या अपघातात आडगाव शिवारात घडला. सोमवारी साडे आठ वाजता मालेगाव येथे राहणारे देविदास धर्मा उशीर (३८) शिर्के कंपनीकडून हॉटेल मिरचीकडे पायी चालत जात असताना पाठीमागून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच १५ डीके १३४३) जबर धडक दिली. त्यात देविदास गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत चालक संशयित जनार्दन दत्ता काशिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू