शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सवंदगाव फाट्यावर दोन अपघातांत तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:12 IST

मालेगाव शहरालगतच्या मुंबई-आग्रा  महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे शुक्रवारी (दि.४) सकाळी झालेल्या दोन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातांत दुचाकीचा चक्काचूर झाला. 

ठळक मुद्देपित्यासह मुलीचा मृत्यू : वाहनांचा चक्काचूर; तिघे जखमी

मालेगाव मध्य : शहरालगतच्या मुंबई-आग्रा  महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे शुक्रवारी (दि.४) सकाळी झालेल्या दोन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातांत दुचाकीचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा समांतर रस्त्याच्या मागणीने जोर धरला आहे. अपघातातील मृतांमध्ये  सुफयान अहमद मोहम्मद शाबान, जवेरिया फिरदौस सुफयान अहमद  या पिता-पुत्रीसह उज्ज्वलाबाई संतोष बोराळे यांचा समावेश आहे. पवारवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सुफयान अहमद मोहम्मद शाबान (३३), रा. अय्युबनगर (गुलशन ए मलिक) हे माळधे शिवारातील हाजी मोहम्मद अब्बास मशिदीचे इमाम होते. सकाळी फजरची नमाज पठण करून परतत असताना सवंदगाव फाटा येथे रस्ता ओलांडताना दुचाकीस (क्रमांक एम. एच.४१ एएन ४१८२) आयशर (क्रमांक जी.जे. १५ ए.व्ही.२२९८) यावरील अज्ञात चालकाने जबर  धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी आयशरच्या खाली दबली गेली होती. यात मौलाना सुफयान अहमद मोहम्मद शाबान यांचा मृत्यू झाला, तर जवेरिया फिरदौस सुफयान अहमद (९), स्वालेहा (७) व बुशरा या तिन्ही बहिणी जखमी झाल्या. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला. नागरिकांनी तिन्ही मुलींना जखमी अवस्थेत उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. यापैकी जवेरिया फिरदौसचा दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद इरफान मोहम्मद शाबान (३५), रा.गुलशन ए मलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाझीम शेख करीत आहेत. दरम्यान, अपघातानंतर याच वाहनाने कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला कट मारल्याने ट्रालीचे नुकसान झाले. त्यामुळे घटनास्थळी रस्त्यावर सर्वत्र कांदे पडलेले होते. मात्र, संबंधित ट्रॅक्टरच्या चालकाने कुठलीही तक्रार दिली नाही. या तिहेरी अपघातात वाहनांचे नुकसान झाले.मुलीनेही सोडला प्राण मौलाना सुफयान अहमद यांना तिन्ही मुलीच आहेत. शाळेला सुटी असल्याने ते अधूनमधून मुलींना नमाज पठण करण्यासाठी  घेऊन जात असत. अपघातात मौलानांचा मृत्यू झाला.  शुक्रवारच्या नमाजनंतर त्यांचा दफनविधी करण्यात आला. याचदरम्यान थोरली मुलगी जवेरिया फिरदौसने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. ही खबर कब्रस्तानात धडकताच नातलगांनी एकच टाहो फोडला.  

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघातDeathमृत्यू