तिहेरी अपघातात तीन ठार
By Admin | Updated: October 22, 2016 02:26 IST2016-10-22T02:26:00+5:302016-10-22T02:26:47+5:30
सिन्नर-शिर्डी मार्गावरील दुर्घटना : वाहतूक कोंडी

तिहेरी अपघातात तीन ठार
सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास खासगी आराम बस, मालवाहू वाहन व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या तिहेरी अपघात तीनजण ठार, तर काही जखमी झाले आहेत.
शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना खासगी आराम बस (एमएच १५ एके ६३९९) व समोरून येणारा खासगी मालवाहू वाहन (एमएच १७, व्हीडी ५१५५) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात बस व मालवाहू वाहनातील तिघे ठार झाले. अपघातामुळे शिर्डी मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना सिन्नरच्या विविध खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)