पेठ रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
By Admin | Updated: September 25, 2015 23:39 IST2015-09-25T23:39:09+5:302015-09-25T23:39:25+5:30
पेठ रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

पेठ रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
पेठ : नाशिक - पेठ रस्त्यावरील सावळ घाटात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पती-पत्नीसह एक जण ठार झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त ट्रक पेटवून दिला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती़
नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या मोटार सायकलस्वारास धडक दिल्याने दिंडोरी तालुक्यातील झार्ली येथील युवक यादव खांडवी (३५) जागीच ठार झाला़
सदरची बातमी समजताच झार्ली येथील शंभर ते दीडशेच्या जमावाने घटनास्थळी धाव घेत ट्रक पेटवून दिला. त्यामुळे सर्वत्र आगीचे लोट पसरले. या अपघातापासून काही अंतरावरच मोटारसायकलने नाशिककडे जाणाऱ्या वाकी येथील दांपत्यास दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने विश्वनाथ पाटील (४०) व रेखा पाटील (३८) हे दोघेही जागीच ठार झाले़ त्यामुळे आधीच संतप्त जमावाने याही ट्रककडे मोर्चा वळवल्याने दोन्हीही ट्रक जमवाने पेटवले़ यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगवले. (वार्ताहर)